कुवेत : १५ भारतीयांची फाशीची शिक्षा रद्द
कुवेतमधील तुरुंगात कैद असलेल्या १५ भारतीयांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. कुवेतच्या अमीर यांनी इतर ११९ भारतीय नागरिकांची शिक्षा कमी करण्याचे आदेशही दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.कुवेतच्या तुरुंगातील १५ भारतीयांची फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेपेत बदलण्यात आल्याने खूपच आनंद झाला आहे. कुवेतच्या अमीर यांचे आभार मानते, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कुवेतमधील नागरी कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांखाली तुरुंगात असलेल्या आणि तीन वर्षे शिक्षा भोगलेल्या केरळच्या सर्व नागरिकांना सोडण्यात येईल, असे सौदी अरेबियातील शारजाह शहराचे प्रमुख शेख सुलतान बिन मुहम्मद अल काझमी यांनी म्हटले होते.