बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑक्टोबर 2017 (11:22 IST)

राज ठाकरे यांनी सत्ता न सोडणाऱ्या शिवसेनेला झापले

सरकारमध्ये जागा घ्यायची,सत्ता उपभोग घ्यायचा आणि वर  म्हणायचं सरकार आमचं ऐकत नाही, मग बसलात कशाला तिकडे असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला विचारला आहे. एल्फिन्स्टन घटनेचा निषेध करणा-या शिवसेनेवर जोरदार  टीका केली आहे. राज म्हणतात की तुम्ही आहात ना बसलात ना सत्तेमध्ये, खुर्च्यांमध्ये बसून एकत्र अंडी उबवताय ना त्यांच्याबरोबरीने. हे शिवसेनेचेच लोक आहेत ना जे तिकडे खासदार, मंत्री होऊन बसलेत, इथेही मंत्री होऊन बसलेत ना. एका बाजूने म्हणायचं सरकार आमचं ऐकत नाही, मग बसलात कशाला तिकडे. दांभिक खोटे आहेत हे सगळे अस बोलत शिवसनेवर जोरदार टीका केली आहे. एल्फिन्स्टन आणि परळ ब्रिजवरील दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.