गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 सप्टेंबर 2017 (09:22 IST)

जगातील सर्वात लठ्ठ महिलेचा मृत्यू

जगातील सर्वात लठ्ठ असलेल्या इमान अहमद (36) या महिलेचा मृत्यू झाला आहे. अबुधाबीतील बु्र्जिल रुग्णालयात वजन कमी करण्याच्या उपचारांदरम्यान तिचं निधन झालं.

काही महिन्यांपूर्वी वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी तिला मुंबईत आणण्यात आलं होतं. त्यानंतर सैफी रुग्णालयात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तिचं वजन 500 किलोंवरुन 238 किलोंपर्यंत कमी झाल्याची माहिती होती. वजनामुळे गेल्या 25 वर्षात घरातून एकदाही बाहेर पडली नव्हती. वजन कमी करण्याच्या उपचारांदरम्यान किडनी फेल आणि आतड्याला सूज आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आलं. 

सैफी रुग्णालयात प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला इमानवर वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करत होते. शस्त्रक्रियेसाठी वन बेड हॉस्पिटल ही संकल्पना वापरण्यात आली होती. इमानच्या शस्त्रक्रियेसाठी 3 हजार स्क्वेअर फुटांची विशेष खोली बनवण्यात आली होती.