सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 26 सप्टेंबर 2017 (09:55 IST)

‘बॉयझ’च्या यशाचं ‘पिकल’ रहस्य

‘सैराट’च्या प्रचंड यशानंतर तब्बल दिड वर्षानंतर ‘बॉयझ्’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवला आणि अजुनही सलग चौथ्या आठवड्यात थिएटर्स हाऊसफुल्ल आहेत. कॉलेजवयीन प्रेक्षकवर्गाला लक्ष करून चित्रपट तयार केला आणि त्या प्रेक्षकवर्गापर्यंत त्यांना आवडेल त्या पद्धतीने सादर करून यश संपादन केले. हा चित्रपट यशस्वी करण्याचा मार्ग बॉयझचे निर्माते राजेन्द्र शिंदे, दिग्दर्शक विशाल देवरूखकर आणि प्रस्तुतकर्ता अवधूत गुप्ते यांनी आखला आणि यश मिळाले. पण, या सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे तो चित्रपट वितरणाचा… जे मराठी चित्रपटसृष्टीत आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचे आणि कठीण आहे. ती जबाबदारी पिकल एंटरटेनमेन्टच्या समीर दिक्षीत आणि ऋषिकेश भिरंगी यांनी समर्थपणे पेलली. त्यामुळे बॉयझ च्या यशात पिकल एंटरटेनमेन्टच्या वितरण प्रणालीची मोठी भूमिका आहे.
 
“चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अमुक एका वाहिनीवरच्या तमुक कार्यक्रमात कलाकार गेले कि चित्रपटाची प्रसिद्धी होते आणि ठराविक एका वितरकामार्फत वितरण केले तसेच ठराविक चित्रपटगृहात सिनेमा लागला की चित्रपट सुपरहीट ठरतो. अशा तथाकथित प्रसिद्धी आणि वितरण व्यवस्थेला फाटा देत बॉयज ने घवघवीत यश संपादित केले आहे. याचा पिकल एंटरटेनमेन्टला मनस्वी आनंद आहे. कारण, प्रस्थापित व्यवस्थेला फाटा देत वेगळ्या वाटा चोखाळून आम्ही रणनिती आखली आणि त्याला निर्माते राजेन्द्र शिंदे तसेच प्रस्तुतकर्ता अवधूत गुप्ते यांनी योग्य साथ दिली. त्यामुळे बॉयझ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आणि नियोजन यशस्वी करणं शक्य झालं.” असे पिकल एंटरटेनमेन्टचे समीर दिक्षीत यांनी सांगितले. 
८ सप्टेबर रोजी बॉयझ महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. चित्रपटाला पहिल्या आठवड्यात 300 सिनेमागृहात 4532 शोज तर दुसऱ्या आठवड्यात 350 थिएटर्स मध्ये 5250 शोज आणि तिसऱ्या आठवड्यात 250 थिएटर्समध्ये 2800 शोज् मिळाले. साधारणत: पहिल्या आठवड्यानंतर शोज् आणि थिएटर्स कमी होतात. परंतु बॉयझ ने हे गणितही मोडून काढले आणि दोन आठवड्यातच 10 कोटीच्या वर गल्ला कमावला. अजुनही हा चित्रपट सिनेमागृहात इतर सर्वभाषिक चित्रपटांना टक्कर देत प्रेक्षकांना आकर्षित करीत आहे. हे सांघिक यश असले तरी सव्वाशेहून अधिक चित्रपट वितरण केलेल्या पिकल एंटरटेनमेन्टचा आजवरचा अनुभव आणि वितरणाच्या अनोख्या तंत्राचा विजय आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.