शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (19:16 IST)

लास वेगास : गोळीबारात 50 ठार, 200 जखमी, एकाला अटक

अमेरिकेतील लास वेगासमध्ये एका म्युझिक फेस्टीव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार झाला आहे.  या गोळीबारात 50 जणांचा मृत्यू झाला असून 200 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 12 जण गंभीर जखमी आहेत. हा गोळीबार सनसेट स्ट्रिप परिसरातील मँडले बे कॅसिनोजवळ झाला. एका हल्लेखोराचा खात्मा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिvनुसार आम्ही मँडले बे कॅसिनोच्या परिसरात हल्लेखोराचा शोध घेत आहोत. नागरिकांनी या परिसरापासून दूर राहावे, असे ट्विट लास व्हेगास मेट्रोपोलिटन पोलिसांनी केले आहे.
 
स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजता गोळीबाराला सुरुवात झाली. या कॅसिनोमध्ये कंट्री म्युझिक फेस्टिव्हल सुरु होता. त्याचवेळी हल्लेखोर घुसले आणि मशीनगनमधून त्याने गोळीबार केला.हा  दहशतवादी हल्ला आहे की अन्य कारण आहे याबाबत अजूनपर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नाही.