सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

हॉट आणि न्यूड प्लेबॉय मासिकाच्या संस्थापकाचा मृत्यू

पर्ण देशात हॉट आणि न्यूड असलेले मॅग्झिन ‘प्लेबॉय’चे संस्थापक ह्यू हेफनर यांचं निधन झालं आहे. हेफनर हा  91 वर्षांचे होते. ह्यू हेफनर यांचं वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याचं मॅग्झिनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
 
जगभरात हे  मॅग्झिन खूप मोठ्या प्रमाणात विकले जाणारे  म्हणून ‘प्लेबॉय’ची ख्याती होती.  यामध्ये जगात जेव्हा 20 शतकात लैंगिक क्रांती होणार होती त्यात  मॅग्झिन म्हणूनही प्लेबॉय नावारुपास आलं होते.
 
‘प्लेबॉय’ हे जगभरातल्या तरुण वयातील मुलांमध्ये प्रचंड आकर्षण होते. या प्रसिद्ध मासिकात  नग्न, अर्धनग्न तरुणींचे बोल्ड फोटो होते. आणि ते  पाहण्यासाठी ‘प्लेबॉय’चा अंक हातोहात विकले जात होते. हे फक्त  अमेरिकेत मर्यादित नव्हते जगभरातील कानाकोपऱ्यात ‘प्लेबॉय’ गेले होते. 
 
यामध्ये 1 ऑक्टोबर 1953 रोजी ‘प्लेबॉय’चा पहिला अंक प्रकाशित झाला होता. 1970 सालापर्यंत ‘प्लेबॉय’ मासिकाचा खप तब्बल 56 लाखाच्या घरात पोहोचला होता.