शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मे 2018 (09:39 IST)

ट्रम्प यांच्या नग्न पुतळ्याचा लिलाव, २८ हजार डॉलरला विकला

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नग्न पुतळ्याचा लिलाव लॉस एंजलिस  येथे करण्यात आला. या लिलावात या पुतळ्याला २८ हजार डॉलर म्हणजेच सुमारे १८ लाख ६६ हजार रुपयांना विकण्यात आला.

याआधी २०१६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या वेळी एका कलाकाराने डोनाल्ड ट्रम्प यांचे काही नग्न पुतळे तयार केले होते. हे नग्न पुतळे लॉस एंजलिस, सॅन फ्रॅन्सिस्को, न्यूयॉर्क, सिएटल आणि क्वीवलँड या ठिकाणी लावण्यात आले होते. या ठिकाणी लावण्यात आलेले हे पुतळे हटवून नष्ट करण्यात आले. मात्र त्यापैकी एक अखेरचा पुतळा नष्ट करण्यात आला नव्हता. या नग्न पुतळ्याचा लिलाव करण्यात आला. जिंजर या कलाकाराने हा पुतळा तयार केला असून या पुतळ्यासाठी माती आणि सिलिकॉन वापरण्यात आले आहे. या पुतळ्याचे वजन ८० पाऊंड आहे . 
 
डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाले तर या पुतळ्याला नक्कीच चांगली किंमत येईल हे आम्हाला ठाऊक होते. म्हणूनच आता  या पुतळ्याचा जाहीर लिलाव केला असल्याचे ज्युलियन ऑक्शन चे सीईओ डेरेन ज्युलियन यांनी सांगितले आहे.