मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 21 मे 2018 (12:30 IST)

म्हैसूरचे सुवर्ण सिंहासन

म्हैसूर राजघराण्याचे सुवर्ण सिंहासन, म्हैसूरच्या महाराजांच्या खासगी दरबारामध्ये विराजमान आहे. दर वर्षी विजयादशमीच्या दिवशी सामान्य जनतेला ह्या सिंहासनाचे दर्शन घेण्याचीमुभा आहे. हे सिंहासन पांडवकालीन असून धर्मराजाचे आहे अशी आख्यायिका आहे. पण आजच्या काळामध्ये दोन वर्षांच्या कालावधीनंतर हे सिंहासन आता सामान्य जनतेला पाहता येणार आहे. ह्या सिंहासनावरील महाराजांच्या बैठकीला 'कूर्मासन' म्हटले जाते. ह्या बैठकीकडे जाण्यासाठी पायर्‍या बनविल्या गेल्या आहेत. बैठकीच्या वर सोन्याने मढविलेले छत्र असून ह्या संपूर्ण सिंहासनावर अतिशय सुंदर हस्तिदंती कोरीव काम आहे. हे सिंहासन मूळचे पांडवांचे असल्याची आख्यायिका आहे. काम्पिलीराय ह्यांनी हे सिंहासन आंध्र प्रदेशातील पेनुगोंडा येथे आणविले. पण हे सिंहासन प्रस्थापित न करता त्यांनी ते लपवून ठेवले. विजयानगरचे संस्थापक राजा पहिले हरिहर ह्यांनी विद्यारण्य ऋषींच्या सांगण्यावरून त्या सिंहासनाचा शोध घेण्यास सुरुवात केली. ऋषीवरांनी सांगितलेल्या नेमक्या ठिकाणीच सिंहासन सापडले. त्यानंतर हे सिंहासन विजयानगर साम्राज्याकडे दोन शतके राहिले. 1609 सालच्या सुमाराला हे सिंहासन वोडेयार राजघराण्याच्या ताब्यात आले. आजही हे सिंहासन वोडेयार घराण्याची शान असून म्हैसूरच्या राजवाड्यामध्ये ठेवलेले आहे.