रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अमरनाथ , शनिवार, 16 जून 2018 (11:21 IST)

दहशतवादी हल्ल्याचे अरनाथयात्रेवर सावट

केंद्र सरकार रमजान ईद झाल्यावर दहशतवाद्यांविरोधात स्थगित करण्यात आलेली मोहीम सुरू करायची की नाही याबाबत विचाराधीन आहे. ही मोहीम स्थगित असतानाच एका सैनिकाला व एका पत्रकाराला ठार करण्यात आले आहे. इतकेच नाही तर अमरनाथ यात्रेवरही दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. या हल्ल्याच्या कटामागे पाकिस्तान आहे असेही समजते आहे.
 
पाकिस्तानातील दहशतवादी संघटना अमरनाथ यात्रेत अडथळा आणण्यासाठी कट रचत असल्याची माहिती तपास यंत्रणांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. 29 जूनपासून अरनाथ यात्रेला सुरुवात होते आहे.
 
रमजानच्या महिन्यात दहशतवातांविरोधात करण्यात येणार्‍या कारवाईच्या मोहिमांना स्थगिती देण्याचा नेमका काय परिणाम झाला याबाबत एक बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत अमरनाथ यात्रेबाबत आणि या यात्रेची सुरक्षा वाढवण्यासंबंधीही विचारविनिमय झाला. अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचे सावट आहे अशात मेहबूबा मुफ्ती सरकारने केंद्राकडे 22 हजार अतिरिक्त सैनिकांची नियुक्ती करावी अशीही मागणी केली आहे.