गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 जून 2018 (08:44 IST)

पाकिस्ताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, चार जवान शहीद

सीमा रेषेवर बुधवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने सीमा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) चार जवान शहीद झाले.तर तीन जवान यात गंभीर जखमी झाले आहेत.
 
मंगळवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने सीमा रेषेवरील सांबा जिल्ह्यातील रामगढ आणि चंबलीयाल या भागांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने या भागांमध्ये भारतीय चौक्यांना लक्ष्य केले. बुधवारी पहाटेपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच होता. चंबलीयाल येथे बीएसएफचे चार जवान पाकच्या गोळीबारात शहीद झाले. तर तीन जवान जखमी झाले.
 
भारताकडून या गोळीबाराल चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.  गेल्या काही दिवसांत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनामध्ये वाढ झाली आहे. याआधी शनिवारी अखनूरमधील परगवाल विभारातही पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला होता. यात बीएसएफचे दोन जवान शहीद झाले होते.