शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई/दिल्ली/लखनऊ , गुरूवार, 28 जून 2018 (11:03 IST)

24 तासात मुंबईसह देशभरात जोरदार पावसाची शक्यता

पुढील 24 तासात देशातील 22 राज्यांत जोरदारपावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर येत्या काही तासांत उत्तर प्रदेशातील 16 जिल्ह्यांना वादळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. याविषयी प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे.
 
हवामान विभागानुसार, महाराष्ट्र, ओरिसा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगना आणि केरळमध्ये या राज्यांत पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता आहे.
 
पुढील काही तासांत उत्तर प्रदेशच्या मथुरा, अलीगड, हाथरस, लखीमपुरखीरी, सीतापूर, शाहजहांपुर, जालौन, इटावा, औरैया, गोंडा, बस्ती, फैजाबाद, आंबेडकर नगर, सिद्धार्थनगर, बलरामपूर आणि सुल्तानपूर या 16 जिल्ह्यात वादळासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच श्रावस्ती, खीरी, पीलीभीत, बरेली, रायपूर, शाहजहांपूर, मुरादाबाद आणि बिजनौर या जिल्ह्यातील जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे.