1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईच्या वडाळामध्ये पार्किंग कोसळली, ढीगाऱ्याखाली कार दबल्या

Mumbai Rains
मुंबई : मुंबईतील वडाळा भागातील अँटॉप हिल परिसरात लॉईड्स ईस्टेटच्या कंपाउंड लागून असलेला भाग कोसळला. यामुळे जवळपासच्या इमारतींतील लोकं बाहेर निघून पात नाहीये. तसेच यामुळे ढीगाऱ्याखाली जवळपास 15-20 कार दबल्या गेल्या. 
 
या दुर्घटनेमुळे शेजारच्या इमारतींनाही यामुळे धोका निर्माण झालाय. इकडे अंधेरी, बांद्रा, सायन, हिंदमाता, दादर सह अनेक क्षेत्रांमध्ये पाणी भरल्यामुळे ट्रॅफिकची गती मंदावली आहे. जोरदार पावसामुळे हिंदमाता येथील रस्ते आणि सायन रेल्वे स्टेशनात पाणी भरून गेले आहे. 
 
तसेच, रेल लाइनवर पाणी भरल्यामुळे वेस्टर्न, हार्बर आणि सेंट्रल लाइन 5-7 मिनिट विलंबाने चालत आहे. ब्रांद्रा स्टेशनावरूनही ट्रेन उशीराने सुटत आहे. हवामान विभागाने पुढील काही तासात मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून अलर्ट जारी करण्यात आले आहे.
 
हवामान शास्त्रज्ञांप्रमाणे पुढील 48 तासात ओडिशा, पश्चिम बंगालच्या इतर भागात, गुजरात, मध्य प्रदेशाच्या काही भागात आणि महाराष्ट्राच्या इतर भागात व पूर्वी उत्तर प्रदेशात पाऊस पडणार.