1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :महड , शनिवार, 23 जून 2018 (15:40 IST)

रायगड विषबाधा प्रकरण: सावळ्या रंगामुळे त्रस्त महिलेने महाप्रसादात टाकलं होतं किटकनाशक

teased for dark
रायगड जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या महड विषबाधा प्रकरणाच्या पोलीस तपासाला अखेर यश आले आहे. महड विषबाधामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महड गावात राहणाऱ्या सुभाष माने यांच्या नूतन घराची वास्तुशांतीच्या कार्यक्रमातीळ महाप्रसाद जेवणातून विषबाधा झाली होती. या घटनेचा तपास खालापूर पोलीस करीत होते. खालापूर पोलिसांच्या एकूण चार तपास पथके याचा तपास करत होते. संपूर्ण रायगड जिल्ह्याला या घटनेने खळबळ उडवून दिली होती. चार लहान मुले आणि एक पुरुष असे एकूण पाच जणांचा या विषबाधेत मृत्यू झाला होता.
 
महड विषबाधा तपासाला खालापूर पोलिसांना यश आले आहे. सुभाष माने यांच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका महिलेने सुभाष माने यांच्या घरी वास्तूशांतीच्या वेळी बनवलेल्या महाप्रसाददाच्या जेवणातील पदार्थामध्ये कीटकनाशक टाकले होते. ज्या महिलेने हे निर्दयी कृत्य केले त्या महिलेला खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी महिले सोबत सुभाष माने या कुटुंबाचे काही दिवसापूर्वी भांडण झाल्याची माहिती समोर येते आहे.