मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जून 2018 (10:26 IST)

स्त्री रोग रुग्णालयात 36 तासांपासून वीज नाही बाळंतीण रस्त्यावर झोपल्या

हिंगोलीच्या वसमत तालुक्यात एक भयानक घटना समोर आली आहे. महावितरणच्या कामामुळे स्त्री रोग रुग्णालयात 36 तासांपासून वीज नाही बाळंतीण रस्त्यावर झोपल्या आहेत. विजेची तार तुटल्यानं ही नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे रुग्ण महिलांचे मोठे हाल झाले आहेत. प्रशासनाने नेहमी प्रमाणे बघ्याची भूमिका घेतली आहे. तर इतका मोठा प्रश्न असतांना लवकर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिक संतप्त आहे. थोडा जरी पाउस झाला तरी महावितरण चे लगेच बारा वाजतात. तर अनेकदा एक काम करायला अनेक दिवस सुद्धा लागतात. महिला सुरक्षा प्रश्न असतांना कोणतही काळजी घेण्यात आली नाही त्यामुळे आता भविष्यात तरी अशी घटना घडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.