बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जून 2018 (17:20 IST)

राहुल गांधी यांची अमित शहा यांच्यावर टीका

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह  नोटाबंदीदरम्यान जुन्या नोटा जिल्हा सहकारी बँकेत जमा करण्याबाबत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसने  अमित शाह संचालक असलेल्या अहमदाबाद सहकारी बँकेत सर्वाधिक जुन्या नोटा जमा झाल्याचा आरोप  केला आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती आरटीआयअंतर्गत मिळाल्याचं  सांगितल आहे. त्यामुळे राजकीय   वातावरण   चांगलेच   तापले आहे.

अमित  शाहांवर टीका करण्याची संधी  यावरुनच काँग्रेस अध्यक्षांनी सोडली नाही. राहुल गांधींना  
भाजप नेते अनेकदा  'शहजादा' म्हणून टोमणे मारतात. मात्र यावेळी  राहुल गांधींनी 'शाह ज्यादा खा गया, असा हॅशटॅग वापरुन जोरदार टीका केली आहे.
 
ते ट्वीट मध्ये लिहितात की,  अभिनंदन, अमित शाह जी, संचालक, अहमदाबाद जिल्हा सरकारी बँक, तुमच्या बँकेने जुन्या नोटा बदलण्याच्या बाबतीत पहिला पुरस्कार जिंकला आहे. पाच दिवसात 750 कोटी रुपये, ज्यामध्ये  लाखो भारतीयांचं आयुष्य नोटाबंदीमुळे उद्ध्वस्त झाल आहे. त्यात  तुमच्या या कामगिरीला आम्ही सलाम करतो.