शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 23 जुलै 2018 (15:05 IST)

खेळाकडे लक्ष द्या, पत्नी, प्रेयसी पासून दूर राहा

टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू खेळाडू आपापल्या पत्नी, मित्र आणि नातेवाईकांसोबत पर्यटन करत आहेत. मात्र आपापल्या पत्नींना महिनाभरासाठी गुडबाय बोलण्याची वेळ या खेळाडूंवर आली आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना पत्नी व प्रेयसी पासून दूर राहण्याचे आदेश संघ व्यवस्थापनाने दिले आहे. 
 
कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी संघाला तयारीसाठी चार दिवसांचा कालावधी मिळत आहे.पहिल्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी भारतीय संघ सोमवारी शेल्मफोर्डसाठी रवाना झाला आहे. मागील काही मालिकांतील अपयशामुळे खेळाडूंच्या कुटुंबीयांवर भरपूर टीका झाली होती. भारत-इंग्लंड मालिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि जर त्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला नाही, तर त्याचे खापर पुन्हा खेळाडूंच्या कुटुंबीयांवर फोडले जाऊ शकते. त्यामुळे व्यवस्थापनाने खेळाडूंना पत्नी आणि गर्लफ्रेंडपासून दूर राहण्यास सांगितले आहे. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे.