बुधवार, 30 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी दुसर्‍या महिलेसोबत सेक्स, सासरच्यांना पाठवला व्हिडिओ

हैदराबाद- नपुंसक असल्याचा दावा खोटा असल्याचं सिद्ध करण्यासाठी एका जावयाने दुसर्‍या महिलेसोबत संबंध स्थापित करून व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ आपल्या सारसर्‍यांना पाठवला. विबावसु नावाच्या या माणसाला हे कृत्य महागात पडले आणि त्याला अटक करण्यात आली आहे. 
 
हैदराबादमध्ये राहणाऱ्या विबावसुच्या पत्नी अनुषाने तो नपुंसक असल्याचा दावा केला असून घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली आहे. यामुळे नाराज झालेल्या विबावसुने पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या महिलेबरोबरचा सेक्स करतानाचा व्हिडिओ काढून पत्नी व सासऱ्याला पाठवला. ते बघून विबावसु विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. नंतर विबावसुला अटक केली गेली.
 
2016 मध्ये विबावसुचा विवाह अनुषा हिच्यासोबत झाला पण दोघांचे मुळीच पटत नव्हते. अनुषा माहेरी निघून गेली आणि नंतर विबावसु नपुंसक असल्याचा दावा करत कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. हा दावा खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी संतापलेल्या विबावसुना सेक्स करतानाचा 5 मिनिटांचा व्हिडिओ सासरच्या मंडळीला पाठवला होता.