बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

युट्युबवर बघून केली बायकोची प्रसूती, बाळ सुखरूप पण आईचा मृत्यू

तामिळनाडू च्या एक घरात प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या पती आणि दोन मित्रांनी मिळून घरीच प्रसूती केली होती. तिघांनी युट्युबवर व्हिडिओ बघून प्रसूती केली.
 
28 वर्षाच्या महिलेने 3.3 किलोग्रॅम वजनी मुलाला जन्म दिला परंतू महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या पती व दोघा मित्रांमधून कोणालाही मेडिकल किंवा प्रसव संबंधी माहिती नव्हती.
 
क्रिथिगा नावाची ही महिला एक खाजगी शाळेत शिक्षिका होती. तिचा नवरा कार्तिकेयन एका कापड निर्माण करणार्‍या कंपनीत काम करतो. दोघांना तीन वर्षाची एक मुलगी देखील आहे. पतीचे म्हणणे आहे की तिची पत्नी घरी बाळाला जन्म देऊ इच्छित होती.  
 
22 जुलै रोजी लेबर पेन झाल्यावर महिलेने घरीच प्रसूती करण्याचा प्रयत्न केला. मुलं जन्माला आल्यावर अधिक प्रमाणात ब्लीडिंग होऊ लागली. नंतर महिलेला हॉस्पिटल हालवण्यात आले परंतू रस्त्यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांनी व्हिडिओ बघितला आहे ज्यात महिला स्वत:च्या मर्जीनं घरी प्रसूती करण्यासाठी इच्छुक दिसत आहे.