सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मागासवर्गीय महिलेला शाळेतील स्वयंपाक करण्यापासून थांबवले

पुन्हा एकदा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तमिळनाडूतील तिरूपूर मध्ये एका मागासवर्गीय  महिलेला  शाळेतील मध्यान्ह भोजन बनवत असल्याने पालकांनी विरोध दर्शवला. च या महिलेला कामावरून न काढल्यास शाळेचे कामकाज बंद करण्याची धमकीही सुद्धा दिली आहे. पी पप्पल ही महिला अरुंथथियार या मागासवर्गीय  समाजाची असून, महिला २००६ साली मध्यान्ह भोजनाच्या योजनेत रुजू झाली. 
 
पप्पल यांनी केलेल्या विनंतीनुसार ३० जून रोजी त्यांची बदली त्यांच्याच गावात करण्यात आली आहे. मात्र जेव्हा त्या भागातील जातीवादी पालकांना कळाले की या शाळेतील मध्यान्ह भोजन एक मागासवर्गीय महिला करत आहे, तेव्हा त्यांनी विरोध दर्शवला आहे.  या महिलेला स्वयंपाक बनवण्याच्या कामातून नाही काढले तर शाळेचे कामकाज बंद पाडू अशी धमकीही त्यांनी दिली. 
 
विभाग विकास अधिकार्‍याने पप्पलच्या बदलीचा आदेश रद्द केला आहे. मात्र हे प्रकरण इथेच न थांबता वाढले आणि नंतर काही मागासवर्गीय  समाजाच्या लोकांनी निदर्शने केली आणि  हे प्रकरण जिल्हाधिकार्‍यांकडे गेले. तेव्हा  तिरुपूरचे जिल्हाधिकारी श्रवण कुमार यांनी पिडीत महिलेला त्याच शाळेत काम करण्याचे आदेश दिले असून, तसेच गौंदर समाजाच्या ७५ महिला आणि पूरूष ज्यांनी या महिलेला विरोध केला होता त्यांच्याविरूद्ध एफआयर दाखल करण्यात आला आहे.