मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 20 जून 2018 (10:22 IST)

अनुकृती वास 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2018' ची मानकरी

femina miss india world 2018
तामिळनाडूची अनुकृती वास 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2018' ची मानकरी ठरली आहे. हरियाणाची मीनाक्षी चौधरी प्रथम उपविजेती, तर आंध्र प्रदेशची श्रेया राव द्वितीय उपविजेती झाली. मुंबईतील एनएससीआय स्टेडियममध्ये 55 वी 'मिस इंडिया' स्पर्धा पार पडला. 30 स्पर्धकांमध्ये हा किताब जिंकण्यासाठी स्पर्धा झाली. मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लर, क्रिकेटपटू केएल राहुल आणि इरफान पठाण, अभिनेता बॉबी देओल, कुणाल कपूर, अभिनेत्री मलायका अरोरा, फॅशन डिझायनर गौरव गुप्ता आणि पत्रकार फाये डिसूझा यांनी स्पर्धेचं परीक्षण केलं. दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता आयुषमान खुराणा यांनी या स्पर्धेचं सूत्रसंचालन केलं.
19 वर्षीय अनुकृती लोयोला महाविद्यालयातून फ्रेंच या विषयात पदवी शिक्षण घेत आहे. तिला मॉडेलिंग आणि अभिनयामध्ये रस आहे. अनुकृती आंतरराष्ट्रीय ब्यूटी पेजंट्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल.