1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

उंच व अरुंद खडकावर वसलेले अनोखे गाव

अनेक जणांना वेगळेपणा म्हणून डोंगर वा उंच ठिकाणी घर बांधून राहणे आवडते. मात्र काही लोक असेही असतात, जे आपला जीव धोक्यात घालून सगळ्याच दृष्टीने असुरक्षित असलेल्या ठिकाणी राहतात. स्पेनधील केस्टेलफोलिट डे ला रोका गावाचाही अशाच ठिकाणांमध्ये समावेश होतो. हे गाव चक्क बसाल्टच्या खडकावर वसलेले आहे. हजारो वर्षांपूर्वी या परिसरात दोन ज्वालामुखींचा उद्रेक झाला होता. पहिला स्फोट बटेट गावात 2.17 लाख वर्षांपूर्वी तर दुसरा बेगुदामध्ये 1.92 लाख वर्षांपूर्वी झाला होता. हळूहळू दोन्ही ज्वालामुखी गोठू लागले व त्यांचा लाव्हारस बसाल्ट खडकांमध्ये परावर्तीत झाला. हे खडक थंड झाल्यानंतर तिथे एक छोटेसे गाव मध्ययुगीन काळात वसले. या गावाची खासियत म्हणजे तिथली घरेही ज्वालामुखीपासून बनलेल्या खडकांपासूनच बनली आहेत. 13 व्या शतकात तिथे सेंटसाल्वोडोर चर्च स्थापन करण्यात आले. आजही ते अस्तित्वात आहे. जमिनीपासून 50 मीटर उंचीवर व सुमारे एक किलोमीटरवर पसरलेले हे गाव ज्या खडकावर वसले आहे तो अतिशय अरुंद असून त्यावरील अनेक घरे खडकाच्या किनार्‍यावर आहेत. फ्लूवीया व टोलोनेल नदीच्या सीमेवरील हे गाव स्पेनधील सर्वात छोटे आहे. तिथल्या घरांमध्ये राहणे म्हणजे जीवाची जोखीम पत्करण्यासारखे आहे. कारण एक छोटीसी चूकही महागात पडू शकते.