शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 16 जून 2018 (12:55 IST)

कोलंबसाचे 500 वर्षे जुने पत्र

विचित्र निर्णयामुंळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर जगभरात टीका होत आहे. त्यातच इराणशी केलेला करार रद्द झाल्यामुळे ट्रम्प आणि पर्यायाने अमेरिकेने युरोपसह इतर अनेक देशांचा रोष ओढवून घेतला आहे. पण अमेरिकेने आपला जुना मित्र स्पेनबरोबर मैत्रीचे एक नवे पाऊल टाकले आहे. कोलंबसाचे 500 वर्षे जुने पत्र अमेरिकेने स्पेनच्या ताब्यात दिले आहे. ख्रिस्तोफर कोलंबसाने 1493 साली आपण अमेरिकेचा आणि त्या संदर्भात लावलेल्या विविध शोधांची माहिती देणारे पत्र आपला राजा फर्डिनांड आणि राणी इजाबेला यांना लिहिले होते. 2004-05 या वर्षांमध्ये स्पेनच्या नॅशनल लायब्ररी ऑफ कॅटलोनिया येथून या पत्राची चोरी झाली होती. हे पत्र अमेरिकेच्या अ‍ॅटर्नी ऑफिसने एका व्यक्तीकडून 10 लाख डॉलर्सना विकत घेतले होते. मात्र हे पत्र चोरीचे होते हे त्यावेळेस अमेरिकेस माहिती नव्हते. 2004 साली नॅशनल लायब्ररी ऑफ कॅटलोनियाने आपल्या संकेतस्थळावर कोलंबसाच्या पत्रासह आपल्याकडे असणार्‍या महत्त्वाच्या दस्तावेजांची माहिती दिली होती. मात्र नोव्हेंबर 2005मध्ये अमेरिकेच्या विधी विभागाने हेपत्र आम्हाला दोन पुस्तक विक्रेत्यांनी विकल्याचे जाहीर केले. डिलावेअर येथे असिस्टंट अ‍ॅटर्नी म्हणून का पाहाणारे जेमी मॅकॉल यांच्यामध्ये या दोन घटनांच्या मधल्या काळात कधीतरी हे पत्र चोरीला गेले असावे आणि लायब्ररीमध्ये त्याच्याजागी बनावट पत्र ठेवले गेले असावे. 2011 साली हे पत्र 9 लाख यूरो इतक्या किमतीला पुन्हा एकदा विकले गेले. याची माहिती अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि कस्टम्स विभागाला समजल्यावर अमेरिका व स्पेनमधील तज्ज्ञांच्या संयुक्त पथकाने कॅटलोनिया लायब्ररीत जाऊन पाहणी केली.