मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

स्क्रीनवर महान, रिअल लाइफमध्ये सैतान, आठ महिलांनी लावला लैंगिक छळाचा आरोप

दुनियेला आपल्या आवाजाने वेड लावणारा मॉर्गन फ्रीमॅन सध्या संकटात आहे. त्यावर आठ महिलांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप लावला आहे. एका मुलीचा दावा आहे की मॉर्गनने तिला विचारले की काय तू अंडरवेअर घालती आहेस? नंतर मॉर्गनने तिचा स्कर्ट वर करण्याचाही प्रयत्न केला. प्रॉडक्शन टीच्या एका सीनियर मेंबरने आरोप लावत म्हटले की मॉर्गन शरीराच्या बनावटीवर देखील कमेंट करायचे.
 
मॉर्गनसोबत काम केलेल्या 16 महिलांशी गोष्टी केल्यावर त्यातून 8 महिलांनी मॉर्गनद्वारे चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे आणि अश्लील कमेंट केल्याचा आरोप लावला. प्रॉडक्शनमध्ये काम करणार्‍या चार महिलांनी आरोप लावले की मागील 10 वर्षात असा व्यवहार सुरू आहे ज्याने महिला परेशान होतात. सीएनएन रिपोर्ट्सप्रमाणे फ्रीमॅन महिलांच्या प्रायव्हेट पार्ट्सला टक लावून बघायचे आणि इंटर्नकडून मसाज देखील करवत होते. 
 
या आरोपांनंतर मॉर्गनने म्हटले की मला ओळखणारे आणि माझ्यासोबत काम करणार्‍यांना माहीत आहे की मी जबरदस्ती कोणाला त्रास देऊ इच्छित नसतो. मी त्या सर्वांशी माफी मागतो ज्यांना माझ्यामुळे त्रास झाला आहे किंवा ज्यांचा मी अपमान केला असं काही करण्याचा माझा हेतू मुळीच नव्हता.