वर्धा : ट्रॅक्टर-टँकरला कारची धडक, दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी
आष्टी-तळेगाव रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-टँकरला कारची धडक झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लग्न समारंभातून परतणाऱ्या एका कुटुंबाची पार्क केलेल्या ट्रॅक्टर-टँकरला धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले. तळेगाव-आष्टी रस्त्यावर रात्री उशिरा हा अपघात झाला. आष्टी शहरातील रहिवासी असलेले पाटील कुटुंब कार भाड्याने घेऊन अमरावती येथे त्यांच्या नातेवाईक कुटुंबाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी जात होते. तिथे संपूर्ण दिवस घालवल्यानंतर संपूर्ण कुटुंब आनंदाने त्याच कारने आष्टीला परतत होते. आष्टी-तळेगाव रस्त्यावर आष्टीपासून थोड्या अंतरावर असलेल्या चांद-सुरज टेकडीजवळ एका अनियंत्रित कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-टँकरवर धडक झाली. या धडकेत चालक आणि आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये आष्टी येथील रहिवासी दिलीप भीमराव पाटील (६३) आणि चालक दस्तगीर इब्राहिम खान (५२) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.
पोलिसांनी पंचनामा तयार करून गुन्हा दाखल केला आहे.
Edited By- Dhanashri Naik