शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

माजी न्यायमूर्ती सी.एस. कर्नन यांना अटक

कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सी.एस. कर्नन यांना अखेर कोईमतूर शहरातून अटक करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात वादग्रस्त विधान केल्याने कर्नन अडचणीत आले होते.

सर्वोच्या न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका न्यायाधीशाला अटक होण्याची घटना घडली आहे. कोलकाता हायकोर्टात न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना सी एस कर्नन यांनी वादग्रस्त आदेश दिले होते.

सुप्रीम कोर्टातल्या आठ वरिष्ठ न्यायाधीशांना तुरूंगात टाकले जावे, असा विचित्र निर्णय त्यांनी दिला होता. यावर सुप्रीम कोर्टाने कर्नन यांच्या मानसिक स्वास्थ्याची तपासणी केली जावी असे म्हटले होते. पण त्याचाही कर्नन यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही आणि त्यांनी आपली विचित्र वर्तणूक सुरूच ठेवल्याने सुप्रीम कोर्टाने अखेर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई केली होती. सुप्रीम कोर्टाने कर्नन यांना सहा महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती.