मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 ऑगस्ट 2018 (14:58 IST)

चायनीज बेतले जीवावर, ९ जणांना विषबाधा

सर्वाना चायनीज खायला आवडते, मात्र हेच चायनीज लोकांच्या जीवाशी आले आहे. शहापूर तालुक्यातील खर्डी गावात चायनीज खाल्यानं 9 जणांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या रूग्णांना उपचारासाठी शहापूर जिल्हा उप रूग्णालयात दाखल करण्यात आले असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आजकाल फास्ट फुडच्या नावाखाली चायनीज खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. गल्लोगल्ली चायनीच्या गाड्या झाल्या आहेत. झटपट आणि चविष्ट खाद्यपदार्थ मिळत असल्यामुळे अऩेकांचा कल चायनीज खाण्याकडे असतो असे चित्र आहे. मात्र हेच चायनीज खाल्ल्यानं विषबाधा झाल्याचा प्रकार खर्डीमध्ये घडलाय. त्यामुळे तुम्ही चायनीज खात असाल तर सावधान. कारण चायनीज खाणं तुमच्या जीवावर बेतू शकतं याचे हे उदाहरण आहे. तेव्हा पुढच्या वेळी चायनीज खात असला तर नक्की पुन्हा एकदा विचार करा नाहीतर हे चायनीज जीवाशी येवू शकते.