मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 जुलै 2018 (16:01 IST)

महाअपघात कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळली ३२ मृत्यूमुखी

दुर्दैवी अपघात घडला आहे. रायगड पोलादपूरच्या घाटात दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळली आहे, या बसमध्ये एकूण ड्रायव्हरसह 3 जण होते. या ३३ जणांपैकी ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शिवसेना आमदार भारत गोगावले यांनी दिली. या भीषण अपघातात मुख्यतः दापोली येथील रहिवासी असून दरीतून ८ मृतदेह बाहेर काढले आहेत. ३३ पैकी एका प्रवाशाने १ जण बचावला आहे. एका कर्मचाऱ्याने अपघातातून बचावला आहे. बस कोसळत असताना त्याने या बसमधून उडी मारली. त्यानंतर कसेबसे बाहेर येऊन त्याने अपघात झाल्याचे विद्यापीठात कळवले. बस जवळपास ३०० फुट दरीत कोसळली आहे. या अपघातामुळे दापोलीत नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
 
३३ कर्मचारी महाबळेश्वरच्या दिशेने बस निघाली होती. आता या सगळ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दापोली कृषी विद्यापीठाची बस होती अशी माहिती समोर येते आहे. रायगडच्या दाभळी टोक इथे ही घटना घडली असून, या बसमध्ये ३३ कर्मचारी पिकनिकला चालले होते. यामध्ये शर्थीने प्रयत्न सुरु असून कोणी वाचालय का याचा तपास करण्यात येतो आहे.