गुरूवार, 27 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सातारा , शनिवार, 28 जुलै 2018 (13:20 IST)

साताऱ्यात भीषण अपघात, 200 फूट दरीत कोसळली बस

accidents satara
प्राथमिक माहितीनुसार महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात एक मिनी बस कोसळली आहे. घाटातील निसरड्या रस्त्यावरून ही बस दरीत किमान दोनशे फूट खाली गेल्याचे समजते. या अपघातात 30 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील पोलिस अन् ट्रॅकर्सचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. 
 
पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील दरीत अडकलेल्या या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, हे अद्याप समजले नसून बचावासाठी कार्यकर्ते खाली उतरल्यानंतरच खरी परिस्थिती स्पष्ट होईल. सातारा जिल्ह्यातून रायगड जिल्ह्याकडे जाणाऱ्या बसमधून कृषी विद्यापीठाचे कर्मचारी सहलीसाठी प्रवास करत होते. दरम्यान, ही बस दापोली येथील असल्याचे समजते.