सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सांगली , शनिवार, 28 जुलै 2018 (11:55 IST)

मुख्यमंत्री बदलला तरीही राज्यात सत्तांतर : चव्हाण

जाहिरातबाजीत अडकलेले केंद्र आणि राज्यातील सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याने आता राज्यात सत्तांतर अटळच आहे. मुख्यमंत्री बदलाची मलमपट्टी उपयोगाची नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली.
 
हरिपूरमधील रामकृष्ण वाटिका येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, देवेंद्र फडणवीस गेल्या वीस वर्षातील संख्याबळाच्या दृष्टीने पॉवरफुल्ल मुख्यमंत्री' आहेत. कारण त्यांना एकहाती सत्ता मिळाली आहे. युती नाममात्र आहे. शिवसेनेची अवस्था रोजच्या कुरबुरीतून दिसते. तरीही त्यांचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. मिळालेल्या चांगल्या जनाधाराचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे लोकांमध्ये विश्वासघात झाल्याची भावना आहे. म्हणून राज्यात नेतृत्व बदलाची भाषा सुरु आहे. ती शिवसेनेने सुरु केली. सरकारच्या शेवटच्या काळात मुख्यमंत्री बदलला तरीही येणार्‍या विधानसभा निवडणूकीत राज्यात परिर्वतन अटळ आहे.''