मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जून 2018 (17:40 IST)

आधार कार्डमधील नवीन बदलांची माहिती ऑनलाईन मिळणार

युनिक आयडेन्टिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) एक नवीन सेवा सुरू केली आहे. यानुसार यूजरला आधार कार्डमधील नवीन बदलांची माहिती ऑनलाईन मिळणार आहे. यूआयडीएआयचे सीईओ अजय भूषण पांडे यांनी सांगितले की,‘ही एक नवीन आणि उपयोगी सेवा आहे. ज्याच्या मदतीने लाक आपल्या आधार कार्डमधील बदलांची अथवा अपडेटची हिस्ट्री यूआयडीएआयच्या वेबसाईटवरून मिळवू शकतील. याचा बीटा व्हर्जन सुरू करण्यात आलं आहे.’आधारकार्ड धारकांना यासाठी यूआयडीएआय वेबसाईटवर‘अपडेट हिस्ट्री’चा वापर करावा लागणार आहे.
 
आधारच्या वेबसाईटवर यासाठी वेगळं सेक्शन असणार आहे. तेथे तुम्हाला आधार कार्डवरील नंबर आणि कॅप्चा भरावा लागेल. त्यानंतर संबधीत व्यक्तीच्या रेजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो नंबर भरल्यानंतर आधारची हिस्ट्री पाहता येणार आहे.