मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 19 मे 2018 (09:14 IST)

क्युबामध्ये विमान कोसळले, १००हून अधिक ठार

क्युबामध्ये बोईंग ७३७ प्रवाशी जेट विमान कोसळले  असून १००हून अधिक प्रवाशांचा यात मृत्यू  झाला आहे.  हवानाच्या मुख्य विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही क्षणातंच हे विमान कोसळले. क्युबाची अधिकृत वेबसाईट क्युबेडिबेटने यासंदर्भात वृत्त दिले आहे. या अपघातात झालेल्या वित्त आणि जीवितहानी झाल्याबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. हवाना विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
अपघातग्रस्त विमान हे डोमेस्टिक विमान होते. ते हवाना येथून होलगुइनकडे निघाले होते. या विमानातून १०४ प्रवासी प्रवास करीत होते. विमान धावपट्टीच्या जवळच कोसळल्याने त्याने पेट घेतला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काळ्या धुराचे लोट पसरल्याबाबतचे समजते.