शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 16 मे 2018 (09:20 IST)

ही किमया संगीताची, कोमात असलेली मुलगी झाली जागी

woman revives from coma
चीनममध्ये  एक मुलगी ४ महिन्यांपासून कोमामध्ये होती. मात्र अचानक तैवानचा पॉपस्टार जे चाऊचे गाणे वाजू लागले आणि चमत्कार झाला. ती पूर्णपणे बरी झाली.  सध्या या मुलीचा किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
 

दक्षिण चीन मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार एक तरुणी गेल्या नोव्हेंबरपासून कोमामध्ये होती. तिचा मेंदू काम करत नव्हता. तरुणीला कोमातून बाहेर आणण्यासाठी रुग्णालया प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु होते. मात्र ती तरुणी कोणत्याच गोष्टीला प्रतिसाद देत नव्हती. मात्र जसे तिने पॉपस्टारचे गाणे ऐकले ती शुद्धीवर आली. हे गाणे एका नर्सच्या मोबाईलमध्ये वाजले. ती नेहमी या पॉपस्टारचे गाणे ऐकत असे. त्यामुळे रुग्णांना पण आवडेल असे वाटल्याने ते गाणे लावत असे. याच गाण्याने चमत्कार घडवला आणि तरुणी शुद्धीत आली.