बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मे 2018 (09:21 IST)

चीनमध्ये प्राणी मित्राची फसवणूक, घेतला कुत्रा निघाला कोल्हा

चीनमधील जिनजोंग शहरात एका प्राणीमित्र महिलेने १४० पाऊंड (१३ हजार) देऊन एक गोंडस पांढराशुभ्र कुत्र्याचे पिल्लू विकत घेतले. पण त्याच्या सवयी व त्याची वेगात होणारी वाढ बघून ती चांगलीच हादरली. कारण त्या पिल्लाचे वागणे, खाणे, भुंकणे आणि सामान्य कुत्र्यांचे वर्तन यांच्यात खूपच फरक होता. म्हणून तिने त्याला प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेले तेव्हा तो कुत्रा नसून कोल्हा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

वांग या महिलेला प्राण्यांची फार आवड असल्याने तिने कुत्रा पाळण्याचे ठरवले. त्यानंतर घराशेजारी असलेल्या ‘पेट शॉप’मधून तिने जपानी वंशाचे स्पिट्ज जातीचे एक पांढरेशुभ्र कुत्र्याचे पिल्लू १४० पाऊंडला विकत घेतले. गोड गोबऱ्या पिल्लाचा वांगला लळा लागला. ती त्याला सतत सोबत ठेवायची.त्याला जराही ती डोळ्याआड जाऊ देत नव्हती. पण नंतर त्याच्यात होणारे बदल तिला खटकू लागले. तो कुत्र्यांना देण्यात येणार अन्न खात नसे. सतत गुरगुरत असायचा. त्याची शेपटीही इतर कुत्र्यांसारखी न वाढता वेगात सरळ वाढत होती.तो भुंकत नव्हता तर विचित्र आवाज काढू लागला होता. ते ऐकून वांग व तिचे शेजारीही घाबरायचे. ती त्याला फिरायला घेऊन जायची तेव्हा इतर कुत्रे त्याला बघुन पळून जात असतं. हे बघून वांग अस्वस्थ झाली होती. त्याला काही आजार झाला असावा असे तिला वाटत होते. म्हणून ती त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली. पण आवश्यक त्या तपासण्या करुन तो कुत्रा नाही तर विशिष्ट जातीचा कोल्हा असल्याचे सांगितले.