सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

चीन साधणार परग्रहवासीयांशी संपर्क

कथित परग्रहवासीय हा पृथ्वीतलावरील लोकांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय बनला आहे. या ब्रह्मांडात ते कोठेही असले, तरी आम्हीच त्यांच्याशी पहिल्यांदा संपर्क साधू, असा दावाच चीनने केला आहे. परग्रहवासीयांचा शोध घेण्यासाठी चीनने अब्जावधी पौंडाची रक्कम अवकाश संशोधनावर खर्च केली आहे. त्यात परग्रहवासीयांचे संदेश टिपण्यासाठी रेडिओ दुर्बिणींच्या उभारणीचा समावेश आहे. रेडिओ दुर्बिणींच्या मदतीने अवकाशातील दीर्घिकांचाही शोध घेता येतो. चीनने एक रेडिओ दुर्बीण तयार केली असून तिचा व्यास तब्बल 500 मीटर इतका आहे.
 
आकारात ती अमेरिकेतील वेधशाळेत असलेल्या दुर्बिणीच्या दुप्पट मोठी आहे. यामुळे ती अवकाशातील खोलवर ठिकाणाहून आलेले संदेश टिपण्यास सक्षम आहे. हा देश अवकाश संशोधनात जगामध्ये अत्यंत शक्तिशाली बनला आहे. चीनने टियांगयाँग ही आपली अवकाश प्रयोगशाळा पृथ्वीच्या कक्षेत सोडून अमेरिकेशी बरोबरी केली आहे. चक्क विज्ञानही कल्पना करु शकणार नाही, इतकी आमची दुर्बीण मोठी आणि क्षमतावान असल्याचा दावा चिनी संशोधक लिऊ सिक्झिन यांनी केली आहे.