सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

लांब केसांच्या महिलांचे गाव

महिलांसाठी त्यांचे केस अतिशय खास असतात. आपले केस लांब, दाट आणि आकर्षक असावे असे प्रत्येक महिलेला वाटत असते व त्यासाठी त्या आपआपल्या परीने प्रयत्न करत असतात. कारण असे केस महिलांच्या सौंदर्याला आणखी हातभार लावतात. मात्र चीनमधील हुआंग्लो नावाच्या गावातील महिलांसाठी तर त्यांचे केस सर्वात मौल्यवान संपत्ती असते. 
 
चीनच्या अन्य गावांप्रमाणेच हु्आंग्लोलाही अतिशय आकर्षक नैसर्गिक सौंदयाचे वरदना लाभले आहे. हे गाव विविध प्रकारच्या प्राचीन परंपरांनी समृद्ध असून पर्यटकांचे तिथे भरपूर मनोरंजन होते. या परंपरांपैकी सर्वात अनोखी व रंजक बाब म्हणजे तिथल्या महिलांचे केस लांब वाढविण्याचे झपाटलेपण. या गावातील याओ प्रजातीच्या महिला जगातील सर्वात लांब केस ठेवणार्‍या म्हणून ओळखल्या जातात. आपल्या या अनोख्या ओळखीबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ह रेकॉर्डमध्ये गुआंग्लोला स्थान मिळालेले आहे.
 
गुआंग्लो गावातील 120 महिलांच्या केसांची सरासरी लांबी 1.7 मीटर म्हणजे जवळपास साडेपाच फूट आहे. सर्वात लांब केसांची लांबी 6.8 फूट आहे. संपूर्ण चीनमध्ये गुआंग्लो सर्वात लांब केसांच्या महिलांचे गाव म्हणून ओळखले जाते.