मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पहिले भारत-चीन योगा कॉलेज चीनमध्ये सुरू

चीनमध्ये योगाभ्यासातील मास्टर्स डिग्री देणारे पहिले योगा कॉलेज सुरू करण्यात आले आहे. या कॉलेजाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
 
आयसीवायसी (इंडिया-चीन योगा कॉलेज) च्या तीन वर्षांच्या मास्टर्स डिग्रीच्या अभ्यासक्रमातील पहिल्या दोन वर्षांचे शिक्षण चीनच्या युन्नान प्रांताची राजधानी कुनमिंग येथे आणि शेवटच्या वर्षाचे शिक्षण भारतात देण्यात येणार असल्याची माहिती आयसीवायसी कॉलेजचे डेप्युटी डीन लू फॅंग़ यांनी दिली आहे.
 
आयसीवायसी कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना युन्नान मिन्झू युनिव्हर्सिटी आणि बेंगळुरू येथाल स्वामी विवेकानंद योगा अनुसंधान संस्थान या दोघांकडूनही डिग्री / डिप्लोमा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तीन वर्षाच्या या अभ्यासक्रमात आसने, प्राणायम, योगा उपचार आणि शरीरविज्ञान यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती शिन हुआ या राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिली आहे. या मध्ये भारतीय संस्कृतीचीही महिती देण्यात येणार आहे. चीनमध्ये योगा अत्यंत लोकप्रिय असून लक्षावधी लोक योगाचा अभ्यास करत असतात.