रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (11:43 IST)

पुन्हा तेच, उत्तर प्रदेशात २४ तासांमध्ये १६ बालकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बाबा राघव दास रुग्णालयात गेल्या २४ तासांमध्ये १६ बालकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या १६ बालकांपैकी १० बालकांवर एनआयसीयूमध्ये उपचार सुरु होते. तर उर्वरित ६ बालकांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

मेंदूशी संबंधित आजारांमुळे आतापर्यंत गोरखपूर आणि शेजारीत भागांमध्ये अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये १६ बालकांनी जीव गमावल्यामुळे बाबा राघव दास रुग्णालयात मृत पावलेल्या बालकांची संख्या ३१० वर पोहोचली आहे. याशिवाय गेल्या २४ तासांमध्ये बाबा राघव दास रुग्णालयात २० बालकांना उपचारांसाठी दाखल करुन घेण्यात आले आहे. यामध्ये देवोरियातील ६, खुशीनगरमधील २, गोरखपूर आणि महाराजगंज येथील प्रत्येकी ४, बस्ती आणि बलरामपूर येथील प्रत्येकी एका बालकाचा समावेश आहे.