गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

उरण शहरात झाला ‘काळा’ पाऊस

black-rain-in-uran-raigad-district

रायगड जिल्ह्यातील उरण शहर परिसरात ‘काळा’ पाऊस झाला आहे. सुमारे अर्धा ते एक तासपर्यंत काळा पाऊस झाल्यामुळे स्थानिकामध्ये भितीचं वातावरण आहे. सुमारे अर्धा ते एक तास  हा ‘काळ्या’ रंगाचा  पाऊस झाला. या पावसा मागच नेमकं कारण अजून समजलेल नाही. 

शुक्रवारी दुपारी मुंबई आणि उरण दरम्यान झालेल्या जोरदार पावसावेळी बुचर बेटावरील तेलाच्या टाकीवर वीज कोसळली. यानंतर या द्वीपावरील तेलाच्या टाकीला मोठी आग लागली. आकाशात मोठ्या प्रमाणात धुराचे लोण पसरले होते. या धुरामुळेच हा काळा पाऊस झाला असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.