रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (09:20 IST)

वारकर्‍यांचे आंदोलन स्थगित

राज्यातील तमाम वारकर्‍यांनी मंगळवार १० ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. पुणे येथे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वारकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी कार्तिकी एकादशीपर्यंत वारकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्‍वासन दिल्याने हे आंदोलन थांबविण्यात येत असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे मानकरी राजाभाऊ महाराज चोपदार यांनी दिली. 

पंढरपूर देवस्थान कमिटीवर केलेली राजकीय नियुक्ती रद्द करू वारकर्‍यांची कमिटी स्थापन करावी या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले होते.