मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बीजिंग (चीन) , शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (10:03 IST)

चीनने आईस्क्रीम निर्मितीत अमेरिकेला मागे टाकले…

आईस्क्रीमची सर्वात जास्त निर्मिती करणारा देश म्हणून चीनने अमेरिकेला मागे टाकून संपूर्ण जगात अग्रस्थान पटकावले आहे. सन 2016 मध्ये चीनमधील गोठवलेली शीत पेये उत्पादकांनी एकूण 33 लाख गोठविलेली पेये तयार केली. आणि त्यापासून सुमारे 6.6 अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळवले अशी माहिती सीएबीसीआय (चायना असोसिएशन ऑफ बेकर्स अंड कन्फेक्‍शनरीज) समितीच्या प्रवक्‍त्यांनी म्हटले आहे. मात्र चीनच्या राष्ट्रीय वृत्तसंस्थेने शिनहुआने अमेरिकेच्या आईसक्रीम उत्पादनाची आकडेवारी दिलेली नाही.
 
मात्र चीनमधील छोट्यामोठ्या आईसक्रीम निर्मात्यांनी तयार केलेले एकूण आईस्क्रीम हिशोबात धरले, तर चीनमधील आईसस्क्रीमचे उत्पादन अमेरिकेपेक्षा जास्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. सन 2015 ते 2025 या काळात आईसक्रीईमची खरेदी दरडोई विक्री एका लिटरवरून 3 लिटरपर्यंत वाढल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र विकसित देशांचा विचार केला, तर चिनी आईसक्रीम इंडस्ट्री बाल्यावस्थेत असल्याचेच म्हणावे लागेल असे झू नियानलिन यांनी म्हटले आहे.