मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

अजूनही हवाई बेटांवर ज्वालामुखीचा उद्रेक सुरू

अमेरिकेतल्या हवाई बेटांवर ज्वालामुखीचा उद्रेक सुरूच आहे. ज्वालामुखीतून निघणारा लावा रहिवासी भागांमध्ये पसरला आहे. रस्त्यांवर लावा पसरत असून आतापर्यंत या ज्वालामुखीनं रस्त्यावरची अनेक वाहने गिळून टाकलीत. या भागातल्या हजारो लोकांनी स्थलांतर केलंय. वीस किलोमीटर अंतरावर हा ज्वालामुखी पसरलाय.आतापर्यंत दहा हजार लोकांना या ज्वालामुखीचा फटका बसलाय. अमेरिकेत काही दिवसांपूर्वी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. 
 
हा स्फोट इतका भीषण आहे की हा लावा हवेत 61 मीटर (200 फूट) उंचपर्यंत उडाला. ज्वालामुखीच्या उद्रेकाअगोदरच खबरदारीचा उपाय म्हणून 1700 हून अधिक लोकांना घटनास्थळावरून हलवण्यात आलं होतं. या सगळ्यांचं आता पुन्हा आपल्या घरी लवकर परतणं अशक्यच दिसतंय.