शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

मरणापूर्वी नेमके काय दिसते?

अनेकांच्या मते जीवनातले अंतिम सत्य हे मृत्यू असते, पण मृत्यूनंतर काय? हा प्रश्न अनेकांना मनात डोकावला असेल. मरणापूर्वी काय दिसते? याबाबत अनेकांच्या मनात कुतूहल आहे, पण एका संशोधनातून मृत्यूपूर्वी तुम्ही काय पाहता? याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
मरणापूर्वी लोक काय पाहतात?
मरणापूर्वी अनेक प्रकारचे व्हिजन दिसते. काही अंधुक छाया दिसते. अनेकांच्या त्यांच्या खोलीच्या कोपर्‍यात काही अंधुक प्रतिमा दिसतात. काहींना या प्रतिमांमध्ये आपले प्रिय व्यक्ती दिसतात. काहींना त्यांना सोडून गेलेल्या मृत व्यक्तीदेखील दिसतात.
 
केव्हा घडतं असे?
वेगवेगळ्या प्रतिमा दिसणे, वेगवेगळ्या प्रतिमा एकत्र येऊन चित्र तयार होणे असा भास होतो. काहींना मरणाच्या काही तासांपूर्वी किंवा दिवसांपूर्वी हा भास होऊ शकतो. अकाली मृत्यू होणार्‍यांमध्ये हा भास दिसत नाही.