गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

13 जुलैला सूर्य ग्रहण, काय करावे काय नाही, जाणून घ्या

13 जुलैला वर्षाचं दुसरं सूर्य ग्रहण आहे. या पूर्वी 15 फेब्रुवारी ला पहिले सूर्य ग्रहण लागले होते. जुलै महिन्यात दोन ग्रहण आहे. पहिले 13 जुलैला सूर्य ग्रहण आणि 27 जुलैला चंद्र ग्रहण लागेल.
 
सूर्य ग्रहणाची अवधी सुमारे 2 तास 25 मिनिट राहील. भारतात हे ग्रहण दिसणार नाही तरी ग्रहण काळात सावध राहणे आणि दान करण्याचे महत्त्व आहे. शास्त्रांप्रमाणे या दरम्यान काही कार्य करणे टाळावे.
 
ग्रहण काळात काय करावे:
 
- प्रभू आराधना करा.
 
- केवळ मंत्रांचे जप केले तरी कितीतरी पट फायदा होतो.
 
- ग्रहणाच्या आधी आणि नंतर स्नान करा.
 
- ग्रहणानंतर गरिबांना दान करा.
 
- पवित्र नदी आणि संगम स्थळी स्नान करा.
 
 
ग्रहण काळात हे करणे टाळावे:
 
- घरातून बाहेर पडू नये.
 
- मूर्ती स्पर्श व मूर्ती पूजा करू नये.
 
- गर्भवती स्त्रियांनी कापणे, शिवणकाम करू नये.
 
- शुभ व नवीन कार्य सुरू करू नये.
 
- यात्रा करणे टाळा.
 
- भोजन, मनोरंजन आणि झोपणे टाळा.