सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

हिंदू धर्मात फार महत्त्व आहे अमावास्याचे, या लोकांना जरूर करायला पाहिजे अमावास्येचा उपास ...

प्राचीन शास्त्रानुसार या तिथीचे स्वामी पितृदेव आहे, म्हणून पितरांच्या तृप्तीसाठी या तिथीचे फार महत्त्व आहे. हिंदू धर्मात अमावस्या तिथीचे फार महत्त्वपूर्ण स्थान आहे.  
 
अमावास्येचा दिवस पितरांची आठवण करणे आणि श्रद्धा भावाने त्यांचे श्राद्ध करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी बरेचशे जातक आपल्या पितरांच्या शांतीसाठी हवन, ब्रह्मभोज इत्यादी करतात आणि सोबत दान-दक्षिणा देखील देतात.   
 
तर जाणून घेऊ की अमावास्येला कशाप्रकारे प्रसन्न करायला पाहिजे. ज्या लोकांच्या पत्रिकेत पितृ दोष असेल, संतानं हीन योग बनत असेल किंवा नवव्या भावात राहू नीचचा असेल तर त्या व्यक्तींनी अमावास्येला उपास ठेवायला पाहिजे.  
 
उपवास केल्याने मनासारखे फळ मिळतात. विष्णू पुराणानुसार श्रद्धा भावाने अमावास्येचा उपास ठेवल्याने पितृ्गणच तृप्त होत नाही बलकी  ब्रह्मा, इंद्र, रुद्र, अश्विनी कुमार, सूर्य, अग्नी, अष्टवसु, वायू, विश्वेदेव, ऋषी, मनुष्य, पशू-पक्षी आणि सरीसृप इत्यादी समस्त भूत प्राणी देखील तृप्त होऊन प्रसन्न होतात.  
 
शास्त्रानुसार असे मानण्यात आले आहे की देवांअगोदर पितरांना प्रसन्न करायला पाहिजे तेव्हाच एखाद्या पूजेचे मनासारखे फळ मिळतात.