शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

पत्रिकेतील हा योग, व्यक्तीला बनवतो धनवान

शास्त्राप्रमाणे जर व्यक्तीला सरस्वती आणि लक्ष्मीचा साथ एकत्र मिळाला तर व्यक्तीने स्वत:ला भाग्यशाली समजायला पाहिजे. धनवान होण्यासाठी भाग्याचा साथ मिळणे देखील जरूरी आहे. धनप्राप्तीसाठी पत्रिकेत काही योग सांगण्यात आले आहे. हे योग व्यक्तीच्या पत्रिकेत उपस्थित असल्याने थोडेच प्रयत्न करून तुम्ही धन मिळवू शकता.
 
जर जाणून घेऊ पत्रिकेतील त्या योगांबद्दल जे व्यक्तीला धनवान बनवतात -
 
पत्रिकेत धनस्थान दुसर्‍या व अकराव्या क्रमांकावर असतो. जर जातकाच्या पत्रिकेत या दोन्ही घरात मंगळ आणि सूर्य एकत्र विराजमान असतील तर तो व्यक्ती उत्तम व्यवसायी बनतो. हा योग असणार्‍या व्यक्तीजवळ भरपूर मात्रेत धन असतो.

जर कुंडलीत दहाव्या स्थानात गुरू आणि मंगळ एकत्र असतील किंवा चंद्र व मंगळ एकत्र असतील तर हा गजकेसरी आणि लक्ष्मी नारायण योग बनवतो.   या दोन्ही योग असणार्‍या जातकांना धन, फारच कमी प्रयासात मिळत. या जातकांची आय अधिक असते आणि व्यय कमी. या योगापासून प्रभावित व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा दृष्टी बनलेली असते.
 
जर एखाद्या जातकाचे सिंह लग्नात दहाव्या स्थानात सूर्य आणि बुध असेल तर हा बुधादित्य योग बनतो. शास्त्रानुसार हा योग व्यक्तीला धनवान बनवतो. जन्म पत्रिकेत दहाव्या स्थानात सूर्य आणि बुध एकत्र असेल तर हा योग बनतो. असा योग असणारा व्यक्ती अतिबुद्धिमान आणि चतुर असतो. या प्रकाराचे जातक फारच कमी वेळेत चर्चित होतात. यांना फारच लवकर मान सन्मान मिळतो.

मीन लग्नात दहाव्या स्थानात जर गुरू आणि चंद्र एकत्र विराजमान असतील तर पत्रिकेच्या केंद्रात त्रिकोण योग बनत. हा योग व्यक्तीला धनवान बनवतो. अशा व्यक्तींचे जीवन राजा महाराजांप्रमाणे असतात. नाव, काम, मान, सन्मान आणि प्रॉपर्टी या जातकांजळ भरपूर मात्रेत असते. 

पंचम भावात जर मेष किंवा वृश्चिकाचा मंगळ असेल आणि लाभ स्थानात शुक्र स्थित असेल तर व्यक्तीला धन संबंधित कुठलेही त्रास होत नाही. याप्रकारे पाचव्या घरात सिंहच्या सूर्य असेल आणि लाभ स्थानात शनी, चंद्र शुक्राने युक्त असेल तर हा योग जातकाला धनी बनवत. 

दुसर्‍या भावात चंद्र असल्याने धनवान असण्याची प्रबळ शक्यता असते. या प्रकारच्या जातकांना जीवनात धन संबंधित समस्या सहसा येत नाही.