मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 6 जून 2018 (14:38 IST)

हातात असेल हे चिन्ह तर मिळेल सासरी धन

हातात गुरु पर्वतावर बनलेले वृत्ताचे चिन्ह फलदायी असते. असे जातक अत्यंत प्रभावशाली असतात आणि आपल्या प्रयत्नांनी सोप्यारित्या उच्च पदावर जाण्यास यशस्वी ठरतात. अशा लोकांना सासरपक्षाकडून विशेष धनाची प्राप्ती होते.
 
शनी पर्वतावर वृत्ताची उपस्थिती व्यक्तीसाठी आकस्मिक धन प्राप्तीचे योग बनवते. अशा व्यक्तींची लॉटरी, जुआ, सट्ट्यात विशेष आवड असते आणि यांच्या माध्यमाने धन प्राप्तीचे विशेष योग बनतात. जर सूर्य पर्वतावर वृत्ताचे चिन्ह असेल तर तो व्यक्ती उच्च आणि सात्त्विक विचारांचा असतो. असा व्यक्ती आपल्या कर्मांद्वारे संपूर्ण विश्वात प्रसिद्धी मिळवतो.
 
चंद्र पर्वतावर वृत्ताची उपस्थिती असल्यामुळे व्यक्तीचे आरोग्य थोडे नरम गरम असत. अशा व्यक्तींना पाण्यापासून दूर राहणेच उत्तम असत. या जागांवर अशा लोकांसाठी मृत्यू योग बनतो. बुध पर्वतावर वृत्ताचे होणे व्यापारच्या दृष्टीने लाभकारी असत. असे चिन्ह असणारे जातक व्यापारात यश मिळवतात आणि विलासिता पूर्ण जीवन जगतात. पर्वतांप्रमाणे रेषांवर देखील वृत्तांचे चिन्ह मिळतात. पण यांचा प्रभाव नकारात्मक असतो. ज्योतिष शास्त्रानुसार जीवन रेषेवर बनलेले वृत्ताचे चिन्ह जातकाचे डोळे कमजोर होण्याकडे संकेत देतात. मस्तिष्क रेषेवर बनलेला वृत्त मानसिक आजारांना जन्म देतो. हृदय रेषेवर उपस्थित वृत्त व्यक्तीचे हृदय रोगी असण्याची भविष्यावाणी करतो.