शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

घरात ठेवा या प्रकारचे शंख, पैसाही आणि प्रेम दोन्ही मिळेल!

शंखाबद्दल आतापर्यंत तुम्ही बरेच काही ऐकले असेल. प्रत्येक शुभ कार्यांमध्ये याचा वापर केला जातो कारण याला फार शुभ मानले गेले आहे. घरात पुजा असो किंवा लग्न प्रत्येक वेळेस शंखाचा वापर केला जातो, पण तुम्हाला हे माहीत नसेल की शंखाच्या मदतीने तुम्हाला मनासारखे प्रेम ही मिळेल आणि पैसापण. तुम्हाला या साठी योग्य प्रकाराच्या शंखाची निवड करणे फारच गरजेचे आहे. जाणून घ्या कोणत्या प्रकाराचा शंख करेल तुमची मदत.... 
 
लक्ष्मीच्या हातात सुशोभित शंख दक्षिणावर्ती शंख असते. याला लक्ष्मी शंख देखील म्हटले जाते. या शंखाचे तोंड उजवीकडे उघडत, जेव्हा की जास्त करून शंखांचे तोंड डावीकडे खुलतात.  
 
दक्षिणावर्ती शंखाला लक्ष्मीसमोर लाल वस्त्रावर ठेवून पूजा केली पाहिजे. असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो.  
जर तुमचे जोडीदारासोबत किंवा प्रियकर/प्रेयसीसोबत ताण तणावाची स्थिती राहत असेल तर हिरा शंख तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.  
असे मानले जाते की या शंखामुळे शुक्र ग्रहाशी निगडित सर्व दोष दूर होण्यास मदत मिळतात आणि शुक्र ग्रहाला प्रेमाचे प्रतीक मानले गेले. ज्याने प्रेमात येणार्‍या सर्व अडचणी दूर होण्यास मदत मिळते.