शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 9 जुलै 2018 (08:53 IST)

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पसंती अभिनेत्रींना

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पसंती ही अभिनेत्यांना नाही तर अभिनेत्रींना मिळत आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या यादीत देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण अव्वल आहे. भारतीय इन्स्टाग्रामवर सर्वाधिक या दोन अभिनेत्रींना फॉलो करतात. प्रियांकाचे इन्स्टाग्रामवर अडीच कोटी फॉलोअर्स आहेत. तर नुकताच या यादीत दीपिका पदुकोणचाही समावेश आहे. दीपिकानंही अडीच कोटींचा टप्पा पार केला आहे. दीपिकानं इन्टाग्राम स्टोरी शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. मात्र ट्विटरच्या यादीत प्रियांका पहिल्या पाचमध्येही नाही. प्रियांकाचे ट्विटवर फॉलोअर्स हे दीपिकाच्या तुलनेत कमी आहे. तर जगभरात सर्वाधिक इन्स्टा फॉलोअर्स सर्वाधिक असणाऱ्या यादीतही हॉलिवूड अभिनेत्री आणि पॉप सिंगरचा समावेश आहे.