मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

चावू नाही तुळशीची पानं, हे करणेही टाळा

तुळशीची पानं चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा धातूचे घटक असतात जे चावल्याने ते दातावर लागतात जे दातांसाठी हानिकारक आहे. तुळशीचे धार्मिक महत्त्व तर आहेच परंतू वैज्ञानिक दुष्ट्यादेखील तुळस एक औषधी आहे. यात खूप गुण असले तरी यापासून काही नुकसानदेखील आहे. पाहू या तुळस कशी आणि कुठे वापरू नये ते...
शिवलिंगावर तुळस चढवू नये
पौराणिक कथेप्रमाणे जालंधर नावाच्या एका असुराला आपल्या पत्नीच्या पवित्रता आणि प्रभू विषाणूंच्या कवचामुळे अमर होण्याचा वरदान प्राप्त होता. त्यामुळे त्यांचा आतंक पसरत होता. हे पाहून प्रभू विष्णू आणि शिव यांनी त्याचा वध करण्याची योजना आखली. आधी विष्णूंनी त्याकडून आपले कवच घेतले आणि नंतर त्याच्या पत्नीची पवित्रता भंग केली. अशाने शिवजींना जालंधरचे वध करण्याची संधी मिळाली. जेव्हा वृंदाला आपल्या पतीच्या मृत्यूबद्दल कळले तर तिला दु:ख झाले आणि तिनी रागात प्रभू शिवला श्राप दिला की त्यांच्यावर कधीही तुळस चढवली जाणार नाही. याच कारणामुळे शिवलिंगावर तुळस चढवतं नाही.

या दिवसांत तुळस तोडू नये
काही विशेष दिवस असे आहे जेव्हा तुळस तोडू नये. जसे एकादशी, रविवार आणि सूर्य व चंद्र ग्रहण काळ. या दिवसांत किंवा रात्री तुळस तोडल्याने व्यक्तीवर दोष लागतो. 
उगाच तुळस तोडू नये
अनावश्यक रूपात तुळशीचे पाने तोडणे योग्य नाही. विनाकारणाने तुळस तोडल्याने मृत्यूचा श्राप लागू शकतो.

स्वर्गाची प्राप्ती
ज्या घरात तुळस लागलेली असेल, आणि त्याची रोज पूजा होत असेल. अश्या कुटुंबातील लोकं मृत्यूनंतर स्वर्गलोकात जातात.
गणेश पूजनात तुळस वर्जित
एका कथेप्रमाणे तुळस वनात फिरत असताना तिने ध्यान करत असलेल्या गणपतींना बघितले आणि त्याच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. गणपतींनी मी ब्रह्मचारी आहे असे म्हणून प्रस्ताव नाकारला तर रुष्ट होऊन तुळशीने त्यांना दो विवाहाचा श्राप दिला. प्रतिक्रिया स्वरूप गणपतींनी तुळशीला एका राक्षसासह विवाह होण्याचा श्राप दिला. नंतर तुळशीने माफीही मागितली तरी गणपतीच्या पूजनेत तुळस वर्जित आहे.

घराबाहेर लावावी तुळस
असे मानले आहे की तुळशीच्या पतीच्या मृत्यूनंतर प्रभू विष्णूंने तुळशीला आपल्या प्रिय सखी राधाप्रमाणे मानले होते. तेव्हा तुळशीने त्याच्या घरात येण्याची परवानगी मागितली परंतू विष्णू म्हणाले की माझे घर देवी लक्ष्मीसाठी आहे तर हृदय तुझ्यासाठी. 
तेव्हा तुळशीने म्हटले की घरात स्थान मिळत नसेल तर घराबाहेर तरी राहण्याची परवानगी द्या. तेव्हा विष्णूंने होकार दिला. तेव्हापासून आजपर्यंत तुळशीचे रोप घर आणि मंदिराच्या बाहेर लावलं जातं.