रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 30 जून 2018 (10:01 IST)

वृत्तपत्र कार्यालयावर झालेल्या गोळीबारात 5 ठार

अमेरिकेतील मेरीलँड प्रांतात वृत्तपत्र कार्यालयावर झालेल्या गोळीबारात 5 ठार झाले असून काही जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या संशियाताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या वृत्तपत्राचं नाव कॅपिटल गॅझेट असं आहे. अटक मारेकरी माथेफिरूचे  व्यक्तीच वय 30 आहे. प्रतक्ष दर्शी असलेल्या पत्रकारानं दिलेल्या माहितीनुसार या बंदूकधाऱ्या व्यक्तीनं कार्यालयाच्या काचेच्या दरवाजाच्या दिशेनं गोळीबार केला होता. त्यावेळी  दरवाजाच्या पलीकडे मोठ्या संख्येनं वृत्तपत्रात काम करणारे कर्मचारी होते.कॅपिटल गॅझेट या दैनिकाची वेबसाईटही आहे. बाल्टीमोर सन मीडिया ग्रुपशी संबधित हे वृत्तपत्र आहे. संशयिताच्या बॅगेत काही बनावट हातबाँब आणि धुराचे बाँब सापडले आहेत.पोलीस अधिकारी विल्यम क्रांफ म्हणाले की कार्यालयाच्या बाहेर एक स्फोटक मिळालं असून ते निकामी करण्यात आलं आहे.